|| श्री देव धावबा बाकैजी प्रसन्न ||

सहा गावच्या ग्रामदेवतांचा थेट पालखी भेट सोहळा

(२७-०३-२०२४)

गाव - सालपे

सालपे ग्रामस्थ हितवर्धक मंडळाच्या वतीने श्री देव धावबा देवस्थान सालपे तर्फे सालपे ग्रामस्थ हितवर्धक मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या भव्य दिव्य पाच पालखी भेट सोहळ्याचे प्रत्यक्षदर्शी संपूर्ण चित्रण आम्ही देवस्थानच्या युट्यूब चॅनेल मार्फत आपल्याला देत आहोत.

हा सोहळा कित्येक पिढ्या सालपे या गावी होत आहे आणि कालापरत्वे या सोहळ्याचे स्वरूप बदलत आहे आणि याचे रूपांतर आता भव्य झाले आहे, हा सोहळा म्हणजे लांजा तालुक्यातील सर्व गावांचे एक स्नेहसंमेलन असते.

समाजामध्ये कायम एकोपा निर्माण व्हावा, गावा-गावामध्ये सलोख्याचे संबंध प्रस्थापित व्हावेत आणि येणाऱ्या नवीन पिढीला एक संस्कृती देण्याचे काम 'सालपे ग्रामस्थ हितवर्धक मंडळ' या सोहळ्याच्या माध्यमातून करत असते.

हा सोहळा म्हणजे श्री देव धावबा सालपे, श्री देव धावबा इंदवटी, श्री देव गांगेश्वर शिपोशी, श्री देव धावबा वाडगाव, श्री पावनाईदेवी बोरिवळे आणि श्री गंगादेवी पुर्ये अश्या सहा गावच्या ग्रामदेवातेच्या आणि सहा भावंडांचा अनोखा थेट पालखी भेट सोहळा.

आम्ही संपूर्ण चित्रण श्री देव धाबवा देवस्थानच्या अधिकृत सोशल मीडिया चॅनेल वरून प्रसारित करत आहोत आपण साऱ्यांनी आपल्या कोकणच्या संस्कृतीसाठी तसेच या सोहळ्यासाठी आमच्या चॅनल ला अवश्य भेट द्या आणि विडिओ आवडला तर नक्की शेअर करा.

धन्यवाद

सालपे ग्रामस्थ हितवर्धक मंडळ