सत्कारमूर्ती
डॉ. मृणाल घाग -सावंत यांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले वुमेन्स अचीवर्स अवार्ड - २०२४

२६-जानेवारी-२०२४

हापकिन इन्स्टिट्यूट फॉर ट्रेनिंग रिसर्च अँड टेस्टिंग, परेल, मुंबई येथे कार्यरत असणाऱ्या डॉ. मृणाल घाग- सावंत यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले वुमन्स अचीवर्स अवॉर्ड - २०२४ प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून प्रदान करण्यात आला.

डॉ. मृणाल घाग - सावंत ह्या सध्या scientific officer and head, department of zoology and toxicology, Haffkin Institute for Training & Testing, परेल , मुंबई येथे कार्यरत आहेत.

दहिवली बुद्रुक गावातील श्री.मुकुंद भिकाजी घाग सध्या राहणार हाफकिन इन्स्टिट्युट यांची डॉ. मृणाल घाग - सावंत कन्या आहे.

कृष्णकांत महाराज घाग यांना वारकरी साहित्य परिषदेचा पुरस्कार जाहीर

चिपळूण(रत्नागिरी ):-- वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र (रजि.),रत्नागिरी यांच्या वतीने वारकरी जीवन गौरव विठ्ठल पुरस्कार दहिवली बुद्रुकचे सुपुत्र ह.भ.प. कृष्णकांत महाराज घाग (कीर्तनकार) यांना घोषित करण्यात आलेला आहे.

कोकण हे वारकरी संप्रदायाची पंढरी आहे. संत साहित्याची सेवा करून, संत साहित्य जनसामान्यांपर्यंत पोहोचवून, सनातन धर्म राष्ट्रीय एकात्मता व समभाव ह्या त्रिसूत्री विचारधारेने जनसामान्यांची सेवा केल्याबद्दल सर्वोत्कृष्ट विठ्ठल पुरस्कार घोषित करण्यात आला असल्याचे वारकरी साहित्य परिषद,रत्नागिरी जिल्ह्याचे अध्यक्ष ह.भ.प. रुपेश महाराज राजेशिर्के यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

कथालेखक श्री. राजेंद्रकुमार घाग

कोकणातील रत्नागिरीचे सुपुत्र व सन्मित्र कथालेखक श्री. राजू घाग यांच्या "नवा गडी नवं राज्य" या मालिकेला झी मराठी अवॉर्ड - २०२२ मधील तब्बल २७ नामांकने प्राप्त झाली आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील नायशी गावचे सुपुत्र असलेल्या श्री.राजू घाग यांनी महाविद्यालयीन शिक्षण रत्नागिरीतील गोगटे जोगळेकर येथे घेताना तेथील महाविद्यालयीन कारकिर्दीत नाटय- अभिनय क्षेत्रातील यशाची कमान सतत चढती ठेवली . यानंतर पुढील व्यावसायिक प्रवासात कोकणातील रत्नागिरीच्या या सुपुत्राचे कथालेखक म्हणून पदार्पण झाले .

झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांचे पसंतीची लोकप्रियता मिळविलेल्या "रात्रीस खेळ चाले" या मालिकेचा यशस्वी कथालेखक म्हणून यशाची मोहोर श्री . राजू घाग यांनी उमटविली . या मालिकेच्या भाग- २ ची कथा व भाग - ३ च्या कथा - पटकथा लेखनासह लॉकडाऊन कालावधीतील ' एक गाव भुताचा ' या मालिकेच्या कथा , पटकथेसह संवाद लेखनही श्री .राजू घाग यांनी केले आहे. याशिवाय दोन कथासंग्रहाचे लेखन त्यांनी केले आहे. श्री . राजू घाग यांच्या झी मराठी वाहिनीवरील ' नवा गडी नवं राज्य ' मालिकेचे कथालेखन असलेल्या या लोकप्रिय मालिकेला झी मराठी वाहिनीवरील २०२२ अवॉर्डसाठी तब्बल २७ नामांकने प्राप्त झाली आहेत .

"नवा गडी नवं राज्य" या लोकप्रिय मालिकेचा यशस्वी कथालेखक म्हणून श्री. राजू घाग यांनी यशाची मोहोर पुन्हा एकदा उमटवून रत्नागिरीवासियांना भुषण ठरणारी अभिनंदनीय कामगिरी केली आहे . कोकणचे नाव रोशन करणारे कथालेखक श्री. राजू घाग यांचे या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन व या क्षेत्रातील अशाच उत्तरोत्तर यशदायी वाटचालीसाठी शुभेच्छा

रात्रीस खेळ चाले मालिकेचे पटकथाकार श्री.राजेंद्रकुमार घाग यांचा सत्कार

रत्नागिरी :-- रात्रीस खेळ चाले मालिकेचे पटकथाकार श्री. राजेंद्रकुमार घाग यांना रात्रीस खेळ चाले मालिकेच्या पटकथेनिमीत्त झी विषेश पुरस्काराने गौरविण्यात आले यानिमित्ताने नगरसेवक उमेश कुळकर्णी भारतीय जनता युवा मोर्चा शहर सरचिटणीस प्रवीण देसाई व जेष्ठ नागरिक प्रभाकर बोरकर यांच्या उपस्थितीत त्यांचे अभिनंदन करण्यात आले यावेळी भाजपा चिटणीस नितीन गांगण स्थानिक रहिवाशी अमेय रायकर डॉ. रेणूशे व प्रणाद सावंत उपस्थित होते. श्री.घाग यांच्या कलेतून संपूर्ण राज्यात रत्नागिरीचे नाव उंचावले ही एक रत्नागिरीकरांसाठी अभिमानास्पद बाब आहे असे मत प्रवीण देसाई यांनी यावेळी व्यक्त केले.

श्री. कल्पेश प्रमोद घाग

Colorado, US येथे २९ ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या NASA च्या 4th Eddy Cross-Disciplinary Conference मध्ये भारतातुन आमंत्रित ८ शास्त्रज्ञ आणि स्पीकर मध्ये आपले बंधू श्री. कल्पेश प्रमोद घाग यांची निवड झाली. आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर घागांचे व दहिवलीचे नाव पोहोचविले आहे. त्याबद्दल खुप खुप शुभेच्छा व अभिनंदन...

सौ. मोनिका किरण घाग

India's first-ever reality series Kumite 1 Warrior Hunt Winner

खरवते ग्रामस्थ श्री किशोर घाग यांची सून सौ. मोनिका किरण घाग (कोमोठे, नवी मुंबई) , यांना त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा !!!

त्रिमुखी देवी श्री वरदान मानाई देवीचा आशीर्वाद आणि श्री देव वेळणेश्वराचे आशीर्वाद सतत त्यांच्या परिवारावर राहोत, ही प्रार्थना !!!

Bright living room with modern inventory
Bright living room with modern inventory

कु. हार्दिक ज्ञानेश्वर घाग

दामोदर नाट्यगृह परेल मुंबई येथे पार पडलेल्या MR AND MISS MUMBAI SUPER MODEL 2022, या मध्ये दहिवली गावचे सुपुत्र कु. हार्दिक ज्ञानेश्वर घाग याने 500 स्पर्धकामधून प्रथम क्रमांक पटकवला त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा !!!

Bright living room with modern inventory
Bright living room with modern inventory

श्री. चंद्रगुप्त (बाळा ) सिताराम घाग

कोकणातील मु. पो. नायशी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी गावचे सुपुत्र सन्माननीय श्री. चंद्रगुप्त (बाळा ) सिताराम घाग यांची महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या संचालक पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन !!!

Miss RUHI GHAG

28-July-2024

Traditional individual 🥇GOLD

Artistic solo 🥇GOLD

Artistic pair 🥈SILVER

Rhythmic pair 🥈SILVER