यादवराव घाग प्रतिष्ठान अंतर्गत शिक्षण प्रबोधिनी गुणगौरव कार्यक्रम
यादवराव घाग प्रतिष्ठान अंतर्गत शिक्षण प्रबोधिनी गुणगौरव २०२५
यादवराव घाग प्रतिष्ठान - शिक्षण प्रबोधिनी तर्फे दरवर्षी प्रतिष्ठान संलग्न गावातील इयत्ता १० वी शालांत परीक्षेत पहिल्या ३ क्रमांकाने उत्तीर्ण होणार्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा गुणगौरव केला जातो.
नायशी
यादवराव घाग प्रतिष्ठान तर्फे दहावी पास विद्यार्थांचा सत्कार नायशी हायस्कुल येथे आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम नायशी महाविद्यालयात शनिवार दिनांक ०९.०८.२०२५ रोजी सकाळी ९.३० वा.आयोजित करण्यात आला होता.
महाविद्यालयाने हा कार्यक्रम त्यांच्या लौकिकाला साजेसा असा अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने व उत्साहात पार पाडला. कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत सुमधुर गणेश वंदना ने झाली त्यानंतर विद्यार्थ्यानी समूह स्वागत गीत सादर करून उपस्थितांचे स्वागत केले. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
महाविद्यालयातील जेष्ठ शिक्षक श्री. संदीप घाग सर यांनी अतिशय समर्पक प्रास्ताविक केले. मुख्याध्यापक श्री. घाडगे सर यांनी आपल्या भाषणातून यादवराव घाग प्रतिष्ठान च्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना होणार्या मदतीचा आढावा घेतला. सत्कारमूर्ती विद्यार्थ्यांनी प्रतिष्ठान चे आभार मानले. श्री. संदेश घाग यांनी प्रतिष्ठान च्या वतीने आपले मनोगत व्यक्त करताना प्रतिष्ठान ची मुख्य उद्दिष्टे व उपक्रमांची माहिती दिली व प्रतिष्ठान विद्यार्थ्यांच्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे उभे राहील याची शाश्वती दिली. शेवटी आभार प्रदर्शन झाले व प्रतिष्ठान च्या वतीने सर्व उपस्थितांना अल्पोपाहार वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली. या प्रसंगी प्रतिष्ठान चे प्रतिनिधी म्हणून श्री. उल्हास घाग, श्री. प्रविण घाग, श्री. विशाल घाग, श्री. विकास घाग, श्री. सागर घाग, श्री. केतन घाग उपस्थित होते. तर शालेय संस्थेच्या वतीने उपाध्यक्ष श्री. सुरेश आग्रे, सचिव श्री. रुपेश गोसावी, माजी अध्यक्ष व संचालक श्री.श्रीधर घाग, संचालक श्री.राजेंद्र राक्षे, संचालक श्री. किशोर कदम, माजी पोलिस पाटील श्री. बळीराम घाग व संपूर्ण शिक्षक वृंद तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते. सत्कार प्राप्त विद्यार्थ्यांच्या पालकांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती दर्शविली.
दहिवली बुद्रुक
यादवराव घाग प्रतिष्ठान -शिक्षण प्रबोधिनी अंतर्गत दहिवली बुद्रुक, रत्नसागर इंग्लिश स्कुल येथे एस. एस. सि.परीक्षेत उत्तीर्ण पहिल्या तीन क्रमांक विध्यार्थ्यांना ट्रॉफी आणि रोख रक्कम बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाला गावातील पालक वर्ग तसेच जेष्ठ नागरिक उपस्थित होते.
गुळवणे
यादवराव घाग प्रतिष्ठान तर्फे दहावी पास विद्यार्थांचा सत्कार गुळवणे गावात 15 ऑगस्ट 2025 रोजी करण्यात आला प्रथम सहसचिव श्रीकृष्ण घाग यांनी प्रतिष्ठानचा उद्देश व करत असलेल्या शैक्षणिक कामाची माहिती देऊन गावातील ज्येष्ठ गुरुजन प्रिन्सिपॉल श्री.कृष्णाजी लक्ष्मण बेटकर सर व गुळवणे शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती भुवड मॅडम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी ग्रामीण भागात प्रतिष्ठानचे काम पाहणारे श्रीराम शंकरराव घाग हे उपस्थित होते
सोनगाव
सोनगाव येथे ट्रॉफी वितरण सोहळा प्रतिष्ठानचे स्थनिक कार्यकर्ते नामदेवराव घाग यांनी अयोजित केला. अनंत तु. घाग यांचे सहकार्य लाभले.



























